नवी दिल्ली – मुंबई इंडियन्सची टीम सध्या सहाव्या आयपीएल विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे. अशात मुंबईच्या टीमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार आणि तिलक यांच्यातील मस्ती पाहायला मिळत आहे.
चेन्नईत लखनौ सुपरजायंट्सवर विजय मिळवल्यानंतर संघ अहमदाबादला रवाना झाला. प्रवासादरम्यान सूर्यकुमार यादव याने तिलक वर्मासोबत एक प्रँक केल्याचे पाहायला मिळाले. विमानात हा प्रॅन्क करण्यात आल्याने आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच एमआयचे चाहते यावर मजेशीर कमेंट करत आहेत.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव सहकारी खेळाडू तिलक वर्मासोबत प्रँक करताना दिसत आहे. सूर्याने एअरहोस्टेसकडून एक लिंबू घेतले आणि शांतपणे झोपलेल्या तिलक वर्माच्या तोंडात पिळले. सूर्याच्या खोडसाळपणाने तिलक वर्मा झोपेतून जागा झाला. व्हिडीओ सुरु आहे समजताच तोही हसला. इतर सहकाऱ्यांनी देखील हसून याचा चांगलाच आनंद घेतला.
Chain se sona hai toh jaag jao 🍋🤣🥲#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @surya_14kumar @TilakV9 MI TV pic.twitter.com/1SjiJtSSx7
— Mumbai Indians (@mipaltan) May 25, 2023
मुंबईने चेपॉक गाजवले
चेपॉक येथे झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने दमदार कामगिरी केली होती. मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने 3.3 षटकात 5 धावा देत 5 बळी घेतले. मधवालच्या घातक गोलंदाजीसमोर लखनौ सुपरजायंट्सचा संपूर्ण संघ 101 धावांत सर्वबाद झाला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 182 धावा केल्या होत्या.