ढाका – बांगलादेशमध्ये पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने बांगलादेशसाठी नवीन व्हिसा धोरण लागू केले आहे. निवडणुकीत सहभाग असलेल्या किंवा संबंधित असलेल्या कोणाही व्यकीला व्हिसा रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकन यांनी “इमिग्रेशन ऍन्ड नॅसनॅलिटी ऍक्ट’ अंतर्गत बुधवारी या नवीन व्हिसा धोरणाची घोषणा केली. बांगलादेशमध्ये मुक्त वातावरणात, पारदर्शकपणे आणि शांततेने निवडणूक प्रक्रिया पार पडावा यासाठी हे नवीन धोरण लागू केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या धोरणांतर्गत, बांगलादेशातील लोकशाही निवडणूक प्रक्रियेला जबाबदार असल्यास किंवा त्यात गुंतलेले असल्यास आम्ही व्यक्ती आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांवर व्हिसा निर्बंध असतील.
सध्याचे आणि माजी बांगलादेशी अधिकारी, सरकार समर्थक आणि विरोधी राजकीय पक्षांचे सदस्य, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे सदस्य, न्यायपालिका आणि सुरक्षा सेवा नवीन धोरणाच्या कक्षेत येऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.