भारतीय मोटोरार्ड संघ न्यूझीलंडमध्ये खेळणार

 पुणे: मोटोरार्डने भारताच्या अंतिम संघाची घोषणा केली आहे. हे खेळाडू मोटोरार्ड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता फेरीनंतर खेळाडूंची निवड करण्यात आली.

बेंगळुरूचे श्री. एच. के नाईक, कोईमतूरचे श्री. शकील बाशा आणि तिरूपूरचे श्री. वी. सत्यनाथ हे तिघे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 75 पेक्षा जास्त संघ मालकांनी राष्ट्रीय पर्वामध्ये सहभाग घेतला.

वैयक्‍तिक राइडर्सनी अत्यंत खडतर साहसी राइडिंग आणि टीमवर्क आव्हानांसारखी विविध टप्पे पार केले. खास चाचण्यांमध्ये राइडिंग क्षमता, टेकनिक, नेव्हिगेशन, फिटनेस, मानसिक अवधान आणि मेकॅनिकल कौशल्ये दाखवण्यात आली.

इंडियन नॅशनल क्‍वॉलिफायर दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते आणि यामध्ये इंटरनॅशनल ट्रॉफीची आव्हाने समाविष्ट असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.