शिलालेखातून उलगडला वाघेश्‍वर मंदिराचा इतिहास

भोसरी – चऱ्होलीच्या श्री वाघेश्‍वर मंदिराच्या बांधकामात असलेला पाकृत भाषेतील शिलालेख सापडला. इतिहासप्रेमी तरुणांनी इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांच्यामार्फत या शिलालेखाचा अर्थ शोधला. त्यातून वाघेश्‍वर मंदिराच्या बांधकामाचा इतिहास उलगडण्यास मदत झाली आहे.

चऱ्होलीतील श्री वाघेश्‍वर मंदिरात मुख्य प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीवर हा शिलालेख उपलब्ध आहे. परिसरातील इतिहासप्रेमी तरुणांनी हा शिलालेखाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली. इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांच्यामार्फत शिलालेखाचे वाचन करण्यात आले. त्यामध्ये हा शिलालेख मूळ प्राकृत भाषेतील व देवनागिरी लिपीमधील आहे. त्याचा मराठीतील अर्थबोध असा आहे की, पुणे जिल्ह्यातील च-होलीमध्ये श्री वाघेश्‍वर मंदिरास महान स्थळ म्हणून संबोधले जाते. दाभाडे घराण्यातील मुळ पुरुष बजपाटील याचा मुलगा सोमाजी याचा मुलगा कृष्णाजी दाभाडे याने श्री वाघेश्‍वर महानस्थळ हे मंदिर बांधले. इ.स. 1725 मध्ये या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली, असा उल्लेख आढळला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.