भारत हा सर्वाधिक कर लावणारा देश- ट्रम्प

वॉशिंग्टन – भारत हा जगात सर्वात जास्त कर लावणारा देश आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. हर्ले डेव्हिडसन मोटरसायकलसह अमेरिकेतील उत्पादनांवर भारताने 100 टक्के कर लावल्याबद्दलचा राग ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्यक्‍त केला आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर कर आकारणे योग्य होणार नाही, असे रिपब्लिकन खासदारांसाठी आयोजित वार्षिक भोजन समारंभामध्ये खासदारांना उद्देशून ट्रम्प बोलत होते.

या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी “जशास तसे’ कर धोरण अवलंबायचे जाहीर केले होते. अमेरिकेत तयार होणाऱ्या हर्लेड डेव्हिडसन मोटरसायकलवरील आयात शुल्क भारताने 100 टक्‍क्‍यावरून 50 टक्के केले, त्याबद्दल ट्रम्प यांनी समाधान व्यक्‍त केले. भारताने लावलेले आयातशुल्क पुरेसे नव्हे, तर योग्य आहे, असे ट्रम्प तेंव्हा म्हणाले होते.
भारत अमेरिकेच्या उत्पादनांवर प्रचंड कर लावणारा “टेरिफ किंग’ असल्याचे ट्रम्प यांनी वेळोवेळी म्हटले आहे.
अमेरिकेच्या हर्ले डेव्हिडसन मोटरसायकलवर 100 टक्के कर लावला जातो. त्यातून भरपूर कमावले जाते. उलट भारतात सायकली तयार होतात, मात्र त्यातवर अमेरिका काहीही कर लावत नाही, हे योग्य नाही असे ट्रम्प म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.