2060 पर्यंत जगातील सर्वाधिक मुस्लिम भारतात असतील

वॉशिंग्टन – जगभरातील मुस्लीम आकडेवारीवर नवे आकडे अमेरिकन थिंक टॅंक प्यू रिसर्च सेंटरने सादर केले आहेत. 2060 पर्यंत सर्वाधिक मुस्लीम आणि ख्रिश्‍चन लोकसंख्या असणाऱ्या देशांचीही यादी सोबतच प्रसिद्ध केली आहे. इंडोनेशियामध्ये सध्या सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या (21 कोटी) आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. सध्या भारतात 19 कोटी 48 लाखांपेक्षा जास्त मुस्लीम लोकसंख्या आहे. एकूण 18 कोटी 40 लाख मुस्लीम पाकिस्तानमध्ये आहेत. तर बांगलादेश चौथ्या आणि नायजेरिया पाचव्या क्रमांकावर आहे.

‘प्यू रिसर्च’च्या आकडेवारीनुसार, भारत हा 2060 पर्यंत सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणारा देश असेल. भारतात मुस्लिमांची लोकसंख्या 2060 पर्यंत 3,33,090,000 एवढी असेल. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 19.4 टक्के ही लोकसंख्या असेल, तर जगातील एकूण मुस्लीम लोकसंख्या 11.1 टक्के असेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारत मुस्लीम राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानलाही मागे टाकणार आहे. पाकिस्तानमध्ये 2060 पर्यंत मुस्लिमांची एकूण लोकसंख्या 28.36 कोटी असेल. हा आकडा पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या एकूण 96.5 टक्के आहे. तर जगभरातील मुस्लीम लोकसंख्येमध्ये पाकिस्तानचे हे 9.5 टक्के योगदान असेल.

नायजेरियाची मुस्लीम लोकसंख्या 2060 पर्यंत 28.31 कोटी होईल आणि सर्वाधिक मुस्लीम असणाऱ्या देशांच्या यादीत या देशाचा तिसरा क्रमांक असेल. सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियात मुस्लीम लोकसंख्येच्या वाढीत घट झाल्याचे चित्र आहे. कारण, इंडोनेशियाचा क्रमांक चौथा (25.34 कोटी) वर्तवण्यात आला आहे. 2060 पर्यंत ही जगातील 8.5 टक्के मुस्लीम लोकसंख्या असेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.