नवी दिल्ली : देशात करोनाचा संसर्ग कायम असल्याचे दिसत आहे. काल कारोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर आज पुन्हा करोनाने डोके वर काढले. देशात गेल्या 24 तासांत 2745 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात मंगळवारी दिवसभरात नव्याने नोंद झालेल्या करोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दैनंदिन आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार देशात गेल्या 24 तासांत 2236 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 17 हजार 810 रुग्णांनी करोनाच्या संसर्गावर मात केली. गेल्या 24 तासांत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र तुलनेने करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मंगळवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 2338 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद आणि 19 जणांचा मृत्यू झाला. देशात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. करोनामुळे भारतात एकुण 5 लाख 24 हजार 636 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, देशभरातील लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत करोनाचे महाराष्ट्रात 711 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात 18 हजार 386 रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत.