महिमा चौधरीची लेक दिसते इतकी स्टायलिश कि अजय देवगणची मुलगी न्यासा तिच्यासमोर पडली फिकी,फोटो पाहिल्यानंतर चाहतेही म्हणाले, WOW

महिमा चौधरीची लेक दिसते इतकी स्टायलिश कि अजय देवगणची मुलगी न्यासा तिच्यासमोर पडली फिकी,फोटो पाहिल्यानंतर चाहतेही म्हणाले, WOW
मुंबई – अभिनेत्री महिमा चौधरी ही ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. महिमाचे खरे नाव रितू चौधरी आहे, पण इंडस्ट्रीत तिचे नाव महिमा म्हणून ओळखले जाते. महिमाने आता अभिनयापासून ब्रेक घेतला, मात्र आजही तिचे चित्रपट प्रेक्षक आवडीने बघतात.
महिमाने ‘मुंबई गँगस्टर’, ‘साया’, ‘तेरे नाम’, ‘धडकन’, ‘बागबान’ आणि ‘परदेस’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. महिमाला गंगा म्हणूनही ओळखले जाते कारण परदेस या चित्रपटात महिमा गंगेच्या भूमिकेत दिसली होती.
हा चित्रपट हिट ठरला होता. चित्रपटातील गाणी आणि महिमाची कारकीर्दही हिट ठरली. आजही लोक महिमा चौधरीच्या अभिनयाला दाद देतात. दुसरीकडे, महिमाचे चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, महिमाला आर्याना चौधरी नावाची मुलगी आहे.
आर्यनाही तिची आई महिमासोबत जाहिराती शूट करते. आर्याना फक्त 15 वर्षांची आहे आर्याना सध्या खूप चर्चेत आली आहे. नुकताच महिमा चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महिमासोबत तिची मुलगी आर्यानाही दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. जी खूप सुंदर दिसत आहे. तिचा लूक एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही.
आर्यानाचा हा लूक पाहून एका चाहत्याने कमेंट केली की, तु एक दिवस मोठी स्टार बनशील. तर दुसर्या चाहत्याने कमेंट करत तू खूप सुंदर दिसत आहेस.असं म्हणत तिचे कौतुक केले आहे.





