नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केल्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरला महागाईचा फटका बसला आहे. बुधवारी सकाळी गॅस वितरण कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. मात्र,आठवडाभरातच व्यावसायिक सिलेंडरवर पुन्हा दिलासा मिळाला आहे.
वाढ करण्यात आलेल्या विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरवर आता ग्राहकांना 50 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. राजधानी दिल्लीत आता 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 1003 रुपयांवरून 1053 रुपयांवर पोहोचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे. तर व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आली.मुंबईत १९९० रुपयांवर, तर चेन्नईमध्ये २१९५ रुपयांपर्यंत एलपीजी गॅसची किंमत कमी झाली आहे.
Domestic 14.2 kg LPG cylinder's prices increased by Rs 50/cylinder with effect from today. Domestic LPG cylinder will now cost Rs 1053 in Delhi. 5kg domestic cylinder price increase by Rs 18/cylinder. 19kg commercial cylinder prices decreased by Rs 8.50.
— ANI (@ANI) July 6, 2022
एक जुलै रोजी दिल्लीमध्ये १९ किलोच्या म्हणजेच व्यवसायिक वापरातील सिलेंडरच्या किंमती १९८ रुपयांनी कमी करण्यात आलेल्या. तर एक जून रोजी व्यवसायिक वापरातील गॅस सिलेंडरच्या किंमती १३५ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.
एक एप्रिल रोजी १९ किलो व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत २५० रुपयांनी वाढवण्यात आलेली. त्यावेळी सिलेंडरची किंमत २ हजार २५३ पर्यंत गेलेली. तर एक मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढवण्यात आलेली. आता पुन्हा एकदा नव्याने किंमती वाढवण्यात आल्याने सर्वसमान्यांच्या खिशाला कात्री बसणार असल्याचे दिसत आहे.