अभिनेत्री – उर्मिला मातोंडकर ही तिच्या काळातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. एकेकाळी उर्मिला तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करायची. उर्मिलाने ‘छम्मा छम्मा’ या गाण्याने खूप प्रसिद्धी मिळवली होती आणि आजही लोक तिच्या डान्सचे वेडे आहेत. पण या गाण्याच्या वेळी उर्मिलाला खूप त्रास सहन करावा लागला हे क्वचितच कुणाला ठाऊक असेल. याचा खुलासा उर्मिलाने नुकताच केला आहे.
View this post on Instagram
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने ‘छम्मा छम्मा’ या गाण्याशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आणि गाण्याच्या शूटिंगदरम्यान तिने जड दागिने घातले होते, असे सांगितले. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनीही तिला दागिने कमी करण्याचा पर्याय दिला आणि सांगितले. अशा जड दागिन्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण उर्मिलाने नकार दिला.
View this post on Instagram
15 किलोचे दागिने घातले होते: उर्मिलाने सांगितले की, तिने या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटात तिची कोणतीही भूमिका नव्हती पण जेव्हा ती गाण्याचे पहिले शूट करत होती, त्यावेळी राजकुमार संतोषी म्हणाले की, ‘उर्मिला, तू खूप भारी दागिने घातले आहेस आणि तुला खूप डान्स करावा लागेल.’ त्यावर उर्मिला म्हणाली होती की. दागिने कमी केले तर मजाच निघून जाईल.
View this post on Instagram
राजकुमार संतोषीचा सल्ला न ऐकने महागात पडले: उर्मिलाने सांगितले की, उर्मिलाने राजकुमार संतोषीचे म्हणणे तितकेसे गांभीर्याने घेतले नाही पण तिला काय माहित की एवढे वजनदार दागिने घालणे तिला खूप जड जाईल. खरं तर, शूटिंगदरम्यान जड कानातले घातल्यामुळे उर्मिलाच्या कानाला गंभीर दुखापत झाली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.
View this post on Instagram
उर्मिलाच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर उर्मिला मातोंडकरने 1980 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती, उर्मिलाला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. उर्मिलाने ‘कुंवरा’, ‘मस्त’, ‘कानून’ सारखे हिट चित्रपट देखील केले आहेत पण आता उर्मिलाने स्वतःला चित्रपटांपासून दूर आहे आणि ती आता राजकारणात हात आजमावत आहे.