गोडाऊन फोडून चोरी करणारी टोळी गजाआड

वाकड पोलिसांची कामगिरी ः 86 कूलरसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त 
पिंपरी – वेगवेगळ्या कंपन्याचे गोडाऊनमधील माल लुटून चोरी करणाऱ्या एका टोळीला वाकड पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. या टोळीकडून ताथवडे येथील गोदामातून चोरलेले 86 कुलर व गुन्ह्यात वापरलेली ट्रक असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

योगेश बाबाजी पुतमाळी (वय-23 रा. माळीवाडी, औरंगाबाद), अजीज बादशहा सय्यद (वय-48, रा. भारतनगर, औरंगाबाद), ज्ञानेश्‍वर रामराव पल्हाळ (वय-23, रा. पवननगर, औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ताथवडे येथील स्नेहांजली रिटेल प्रा. लिमिटेड या कंपनीचे रघुनंदन मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या गोडाऊनचा पत्रा उचकुटून गोडाऊनमधील 90 कुलर व एक किचन एक्‍झॉस्ट चिमणी चोरुन नेली होती. या प्रकरणात वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तपासा दरम्यान ही चोरी औरंगाबाद येथील चोरट्यांनी केली असल्याचे समजले. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवत औरंगाबादमधून तीनही चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केल्यानंतर त्यांनी चोरीची कबूली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरलेले 86 कुलर व एक एक्‍झॉस्ट चिमणी तसेच गुन्ह्यात वापरलेला ट्रकही ताब्यात घेतला आहे. या आरोपींवर पुणे व औरंगाबाद जिल्ह्यात विविध कंपनीचे गोडाऊन फोडल्याचे गुन्हे दाखल आहेत. तिघांनाही न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना अधिक तपासासाठी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)