तहसीलदार सुनील कोळी यांनी दिली माहिती
हवेलीत प्रभाग रचना, आरक्षण सोडत आजपासून
थेऊर (वार्ताहर) –हवेली तालुक्यातील जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत एकूण 55 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे. हा कार्यक्रम सुचिनुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षणाच्या विशेप ग्रामसभा दि. 28 व 29 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिली.
दि. 28 रोजी सकाळी 10. 30 वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन, खडकवाडी, केसनंद, खेड-शिवापूर, घेरा – सिंहगड, वडकी, मांजरी खुर्द, अष्टापूर, गाऊडदरा, थेऊर, वरदाडे, शिंदवणे, सांगरून, तुळापूर, न्हावी-सांडस, खामगांव-टेक, गोऱ्हे खुर्द. दुपारी तीन वाजता लोणी काळभोर, नायगांव, कुडजे, बिवरी, कोंढणपूर, सोनापूर, वडाचीवाडी, भावडी, भवरापूर, श्रीरामनगर, आर्वी, वळती, बहुली, शिरसवडी, सांगवी सांडस, कोरेगांव मूळ, गोऱ्हे बुद्रुक.
दि. 29- सकाळी 10. 30- पेठ, मांडवी बुद्रुक, बकोरी, रहाटवडे, डोणजे, शेवाळेवाडी, हिंगणगांव, डोंगरगांव, तरडे, आळंदी म्हातोबाची, आंबी, शिंदेवाडी. दुपारी 3- प्रयागधाम, मांडवी खुर्द, वढू खुर्द, शिवापूर, मणेरवाडी, औताडे हंडेवाडी, कुंजीरवाडी, जांभळी, सोरतापवाडी.
प्रभाग रचना व आरक्षणाच्या विशेप ग्रामसभासाठी अध्यासी अधिकारी म्हणून मंडल अधिकारी दीपक चव्हाण (उरूळी कांचन), प्रमोद भांड (कोथरूड), किशोर शिंगोटे (वाघोली), सूर्यकांत पाटील (खेडशिवापूर), रोहीदास जाधव, (खडकवासला), व्यंकटेश चिरमुला, मंडल (हडपसर), बाळासाहेब शेडगे (कळस), अनधिकृत बिनशेती मंडल अधिकारी क्रमांक 1 सी. आर. गवंडी, अनधिकृत बिनशेती मंडल अधिकारी क्रमांक 2- किशार जाधव, अव्वल कारकून राजकुमार लांडगे, सुधीर वाघमारे, सतीश उचाळे, विस्तार अधिकारी अजित घोंगरे, महेश वाघमारे, नवनाथ कांरडे, दत्तात्रय म्हेत्रे, निकेतन धापटे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा, यासाठी पोलीस निरीक्षक हवेली, पोलीस निरीक्षक राजगड, पोलीस निरीक्षक लोणीकंद, पोलीस निरीक्षक लोणी काळभोर, पोलीस निरीक्षक उत्तमनगर, पोलीस निरीक्षक हडपसर व पोलीस निरीक्षक कोंढवा यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
– सुनील कोळी, तहसीलदार, हवेली.