राजगुरूनगर -खेड तालुक्यात 24 तासांत 72 व्यक्तीचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्याची करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1371 इतकी झाली आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात करोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये चाकण आणि परिसरातील गावांमध्ये करोनाने जास्त हातपाय पसरले आहेत. चाकणमध्ये बाधितांची संख्या तीनशेवर पोहोचली आहे. राजगुरूनगर 151 व आळंदी नगरपरिषद हद्दीत आतापर्यंत 132 पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्या आहेत. खेड तालुक्यात मागील 24 तासांत चाकण 12, आळंदी 8, राजगुरूनगर 7 अशा तीन नगर परिषदा मिळून 27 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागातील शेलगाव (9), मेदनकरवाडी (6), नाणेकरवाडी (2), सातकरस्थळ (3), सातकरस्थळ (3), म्हाळुंगे (3), येलवडी (2), गोलेगाव (2), शिरोली, पिंपरी बुद्रुक, सांगुर्डी, खालूंब्रे, शिंदे, चिंबळी, कडाचीवाडी, किवळे, कडूस, सायगाव, वाडा, धानोरे या गावांमध्ये प्रत्येकी एक अशा 20 गावात एकूण 45 व्यक्ती कारोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.