जिल्हा प्रशासन लगोलग हलते, भुककथेतील माणुसकीचा झरा
वाराणसी : वाराणसीतील एका छोट्याशा गावात लहान गावात भुकेने व्याकुळ झालेली लहान मुले झुडपे खात असल्याचे करुण छायाचित्र व्हायरल झाले अन् जिल्हा प्रशासनाने तेथे धाव घेतली.या शेअर झालेल्या व्हिडीओत स्टीलच्या भांड्यात झुडपतून काही तरी घेऊन खात असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ पाहताच वाराणसी जिल्ह्यातील बारा गाव भागातील प्रशासन घटनास्थळावर पोहोचले. त्यावेळी ही मुले मुसाहर समाजातील असल्याचे स्पष्ट झाले. ही झुडपे खाणारी सहा मुले कोयरीपुर गावातील असल्याचे स्पष्ट झाले.
त्यांचा हे छायाचित्र गुरुवारी व्हायरल झाले. ते यावे काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर झाले.
ही मुले सोलाणा खात होत होती. त्यांचे कुटुंब. हे शिधापत्रिका धारक आहे. या महिन्याचे रेशन त्यांनी नेले आहे. त्यांना जादाचे रेशन देण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले. बारागवचे क्षेत्रीय अधिकारी संजय सिंह म्हणाले , ही घटना मला बुधवारी स्थानिक पत्रकरमकडून समजली. त्याने सांगितले की, मुसाहार वसाहतीत अन्नाचा तुटवडा आहे.मी तातडीने तहसीलदारांना या कुटुंबांना मदत करण्याची सूचना केली. या मुलांच्या कुटुंबीयांना १०किलो तांदूळ.खाद्यतेल, बटाटे आणि काही जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. त्यांना आजही काही मदत देण्यात आली.
मी त्या भागाला भेट देऊन जीवनावश्यक वस्तू मिळाल्याची खातरजमा केली आहे. यातील काही मुलांचे पालक मजूरी करतात. ते काहींचे पालक भिकारी आहेत.अन्य एका व्हिडीओत पोलिस पथक त्या भागाला भेट देत आहे. त्यातील अधिकारी तुम्ही तुमच्या सरपंचांना तुमच्या अडचणी सांगा. त्यांनी लक्ष दिले नाही तर बेलाशक मला भेटा. घाबरण्याची गरज नाही. मी रेशनची व्यवस्था क्रेन असे म्हणताना दिसत आहे.