बुलडाणा: कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयीताचा बुलढाणा येथे मृत्यू झाल्याची वार्ता काल पसरली होती. मात्र, सदर वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदरील रुग्णाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
हा रुग्ण सौदी अरेबिया येथून परतला होता. रुग्णाला ताप आणि सर्दीची लक्षणे आढळल्यामुळे एका खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.