मस्कत – भारताचा युवा टेबल टेनिसपटू जीत चंद्राने ओमान ओपन आयटीटीएफ चॅलेजर टेबल टेनिस स्पर्धेतील 21 वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील 21 वर्षाखालील मुलांच्या अंतिम लढतीत जीत चंद्राने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्याच मानव ठक्करला 11-6,117-7,13-11 असे पराभूत करत विजेतेपदाला गणवसणी घातली.
पहिले दोन सेट गमावल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये विजय मिळविण्याचा प्रयत्न केला पण चंद्राने बाजी मारत विजय नोंदविला. ही लढत 24 मिनिटे चालली. हरियाचा जीत चंद्रा क्रमवारीत अठराव्या स्थानावर आहे.