विहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू

तारळी प्रकल्पाअंतर्गत पाईपलाईन कामावरील घटना

नागठाणे – कोपर्डे (ता. सातारा) येथील लिंबाचीपट्टी नावच्या शिवारात तारळे प्रकल्पाअंतर्गत मे. प्रसाद ऍण्ड कंपनीमार्फत सुरू असणाऱ्या पाईपलाईन कामावर एका मजूर कामगार महिलेचा विहिरीत पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रंगाम्मा विरेश बोगम (वय 35, रा. धनवाडा ता. धनवाडा जि. महाबूबनगर राज्य तेलांगणा. सध्या रा.वेणेगाव ता.सातारा) असे मृत झालेल्या मजुर महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सात महिन्यापासून मे.प्रसाद ऍण्ड कंपनी सासपडे येथे मजुरी करण्यासाठी हे कुटुंब आले होते. कोपर्डे हद्दीतील नागाईदेवी मंदिराजवळ लिंबाचीपट्टी नावच्या शिवारात तारळी प्रकल्पाअंतर्गत पाईपलाईनचे काम करण्यासाठी सोमवारी सकाळी रंगाम्मा व तिची आई व्यंकटमा आले असताना नेहमीप्रमाणे साईडवर जेवायला बसले होते. यावेळी रंगाम्मा ही कोपर्डे येथील काकासो सिताराम निकम यांच्या मालकीच्या विहिरीवर घागर घेऊन पाणी आणण्यासाठी गेली होती.

जेवण झाले तरी रंगाम्मा येत नसल्याचे पाहून आई व्यंकटमा हिने कामावर असणारे राजू काशीमाप्पा कावरी यांना विहिरीवर जाण्यासाठी सांगितले. मात्र कावरी हा विहिरीजवळ गेला असता फक्त घागर व चप्पल विहिरीत दिसत होत्या. रंगाम्मा नसल्याचे पाहून विहिरीत बुडल्याचे लक्षात येताच आरडाओरडा केला. यावेळी रंगाम्मास पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.