पिंपरी – शहरातील महाविद्यालये पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉस्टेलमधील कोविड केअर सेंटर बंद करून हॉस्टेल महाविद्यालयाच्या ताब्यात द्यावे लागतील. त्यामुळे महाविद्यालयांतील कोविड सेंटर बंद केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
करोनाग्रस्त रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेले नागरिक, स्वॅब तपासणीसाठी पाठविलेले नागरिक आणि अलगीकरणासाठी शहराच्या विविध भागांतील 11 ठिकाणी कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारले होते. बेडची अतिरिक्त सोय उपलब्ध झाल्याने महाविद्यालयांच्या हॉस्टेलमधील कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहेत.