पुणे – अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या शिवजन्मभूमी अर्थात किल्ले शिवनेरी काल (दि. ६) सायंकाळी भगव्या रंगात बुडून गेली होती. संपूर्ण राज्यात रविवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली.
संध्याकाळ होताच अगदी ढगाळ वातावरणासह शिवजन्मभूमी मध्ये मनमोहक दृष्य पाहायला मिळालं. हिंदु धर्मात पवित्र मानला जाणारा भगवा रंग काल शिवजन्मभूमीच्या प्रेमातच पडला होता.
https://www.facebook.com/ganesh.shete.528316/videos/2722918221310234/
रविवारी सायंकाळी आसमंत दाटून आले आणि काही सेकंद संपूर्ण किल्ले शिवनेरी भगव्या रंगात बुडून गेली. सायंकाळ झाल्याने घरट्याकडे परतणाऱ्या पक्षांचा थवाही या निमित्त यात वेगळं सौंदर्य खुलवत होता.
https://www.facebook.com/ganesh.shete.528316/videos/2722918301310226/
ही नयनरम्य आणि डोळे दिपवणारी दृश्य काल अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून घेतली होती. त्यामुळे जुन्नर मधील प्रत्येकाच्या स्टेटसवर किल्ले शिवनेरी चे भगव्या रंगातील व्हिडिओ आणि फोटो झळकू लागली. कालचे हे नयन रम्य दृष्य आनंदाचं हसू येतं आणि सुखाचा अनुभव देणारे होते.