अमेरिकेत विमान नदीत कोसळले

जॅकसनविले – क्‍युबातून उत्तर फ्लोरिडा कडे जाणारे विमान रनवेवरून घसरून रनवे शेजारी असलेल्या एका नदीतच कोसळण्याचा प्रकार आज येथे घडला परंतु यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोईंग 737 जातीचे हे विमान क्‍युबातहून आले होते ते शुक्रवारी रात्री सेंट जॉन्स नदीत कोसळले. नदीत पाणी फार नव्हते त्यामुळे फार मोठी दुर्घटना घडली नाही. विमानातील सर्व प्रवासी सुदैवाने वाचले. विमान बुडाले नाही. अमेरिकेच्या नौदलाने तातडीने घटनास्थळी दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांना मदत करून त्यांना सुखरूप बाहेर काढले. हे विमाने जमीनीवर उतरल्यानंतर रनवेवर काही अंतर धाऊन धांबणे अपेक्षित होते पण ते थांबले नाही. व ते तसेच पुढे गेल्याने हा प्रकार घडला पण हे विमान तसेच पुढे कसे गेले याचे नेमके कारण मात्र अद्याप समजले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.