मेम्फिस (अमेरिका) – अमेरिकेतील टेनेसी प्रांतातील मेम्फिस शहरात एका पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात किमान १४ जण जखमी झाले असून २ जण ठार झाले आहेत.
ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ऑरेंज माऊंड पार्कमध्ये एका पार्टीत घडली. या पार्टीला २०० ते ३०० जण उपस्थित होते. मात्र या पार्टीसाठीची अनुमती घेण्यात आली नव्हती.
यावेळी झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. इतर ११ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची दुखापत गंभीर नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हा गोळीबार कोणी आणि कोणत्या हेतूने केला हे त्वरित समजू शकले नाही. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली गेलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी पार्टीच्या ठिकाणची सीसीटिव्हीचे फुटेज तपासले जात आहे. अमेरिकेमध्ये स्वैर गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अमेरिकेत वर्षात अशा प्रकारच्या एकूण ११५ घटना घडल्या आहेत.