वॉशिंग्टन – सोशल मीडिया ऍप टिकृटॉकवर बंदी घालण्याच्या विधेयकाला अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाने मंजूरी दिली. टिक-टॉक या सोशल मीडिया कंपनीची मालकी बायडान्स या चिनी कंपनीकडे असल्यामुळे अमेरिकेच्या संसदेने टिक-टॉकविरोधी पाऊल उचलले आहे.
प्रतिनिधी गृहाने ३६० विरुद्ध ५८ अशा फरकाने हे विधेयक मंजूर केले. अमेरिकेत टिक-टॉक हे ऍप वापरणारे तब्बल १७० दशलक्ष लोक आहेत. या ऍपच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची वैयक्तिक महीती चोरली जात असल्याचा आरोप अमेरिकेकडून केला जात होता.
जर टिक-टॉकची मालकी अन्य कंपनीकडे दिली गेली नाही, तर अमेरिकेत या ऍपवर बंदी घातली जाईल, असा इसारा देणारा प्रस्ताव अमेरिकच्या प्रतिनिधी गृहात मार्चमध्ये करण्यात आला होता.
आज मंजूर विधेयकानुसार टिक-टॉकला नवीन मालकी शोधण्यासाठी २७० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर या कालावधीमध्ये नवीन मालक कंपनीकडे टिक-टॉकची मालकी गेली नाही, तर अमेरिकेत या ऍपवर बंदी घातली जाऊ शकते.