इस्त्रायली हल्ल्यात तीन पॅलेस्टाईन नागरीक ठार

गाझा – गाझापट्टीत काल इस्त्रायली सैनिकांनी केलेल्या हवाईहल्ल्यात तीन पॅलेस्टाईन नागरीक ठार झाले त्यात हमास या संघटनेच्या दोन गनिमांचा समावेश आहे.. इस्त्रायल आणि गाझापट्टीच्या सीमावर्ती भागात पॅलेस्टाईनच्या बाजूनेही इस्त्रायली सैनिकांवर गोळीबार करण्यात आला त्यात दोन जण जखमी झाले आहेत. त्यानंतर इस्त्रायलकडून गाझापट्टीत हवाईहल्ले केले जातील अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती त्यानुसार हवाई हल्ले करून इस्त्रायलला हे प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात हे तीन जण ठार झाले. हमासच्या तळावरच हे हल्ले करण्यात आले. त्यामुळे नागरी वस्तीला त्याची हानी पोहचली नाही असे इस्त्रायली लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. इस्त्रायलने केलेल्या या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशाराही पॅलेस्टाईनने दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.