महामार्गावर प्रवाशांची लुटमार करणारे आरोपी जेरबंद

नगर  – नगर- औरंगाबात महामार्गावर प्रवाशांना अडवून लुटमार करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. ही कारवाई गुरुवार (दि.18) रोजी करण्यात आली. सुनिल संजय शिंदे,(वय-24, रा. संभाजीनगर, ता. नेवासा) यांस ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत इतर साथीदारांबाबत विचापूस केली असता त्याने हा गुन्हा अनिल विठ्ठल कुसळकर,(रा.संभाजीनगर, ता. नेवासा), अमोल शेलार (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांनी मिळून केला असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहिती नुसार शिंदे हा नेवासे येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस दत्ता गव्हाणे, विजय वेठेकर, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, रवि सोनटक्के, भगिरथ पंचमुख, मेघराज कोल्हे, दीपक शिंदे, बाळु पालवे, चालक बबन बेरड यांनी सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्याला नेवासा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.