स्टेशन रस्त्यावरील बेकायदेशीर भिंत मनपाने पाडली

नगर – शहरातील स्टेशन रस्त्यावरील बेकायदेशीरपणे बांधकाम करत उभारलेली संरक्षक भिंत महापालिकेच्या प्रभाग समिती 4 च्या पथकाने गुरुवारी (दि.18) रोजी दुपारी धडक कारवाई करत जेसीबीच्या साह्याने जमिनदोस्त केली.

या बांधकामाबाबत अनिस रशिद शेख यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची उपायुक्तांसमोर सुनावणी झाली. हे बांधकामाची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जागा मालकाने हे बांधकाम 15 दिवसात स्वत:हून काढून घेण्याचे आदेश उपायुक्तांनी 20 डिसेंबर 2018 रोजी दिले होते. मात्र, हे बांधकाम स्वत:हून काढून न घेतल्याने प्रभाग अधिकारी नाना गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक तसेच क्षेत्रीय अधिकारी अमोल कोतकर, अनिल आढाव, कर निरीक्षक व्ही. जी. जोशी यांच्या पथकाने कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.