जामखेड (प्रतिनिधी): शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष निखल घायतडक व त्यांचे समर्थक दहा नगरसेवकांनी राजीनामा नाट्याला अखेर पुर्णविराम मिळाला असुन माजी मंत्री राम शिंदे यांची साथ सोडून आगामी काळात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरविले आहे. असे पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष निखल घायतडक यांनी सांगितले. त्यामुळे नगराध्यक्षासह दहा नगरसेवक राष्ट्रवादीत पुन्हा एकदा जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया आली नाही
नगराध्यक्ष निखल घायतडक यांनी दोन वषार्पूर्वी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. त्यानुसार निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून निखिल घायतडक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबावतंत्र चालू होते. लॉकडाऊनमुळे थांबलेले दबावतंत्र दोन दिवसात पून्हा सूरू झाले.
याबाबत नगराध्यक्षांनी आपल्या सहकारी नगरसेवकांना याची कल्पना दिली. त्यानुसार माजी नगराध्यक्षा प्रीती विकास राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गूलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात, सुमन आशोक शेळके , मेहरुनिसा शफी कूरेशी, जकीया आयुब शेख, या दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्याकडे दिले होते.
जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाव येत असल्याने पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. यामुळे समर्थक दहा नगरसेवकांनी देखील तातडीने आपल्या नगरसेवक पदांचे राजीनामे माझ्याकडे दिले. दरम्यान नगराध्यक्ष कधी राजीनामा देतात याकडे भाजपचे लक्ष होते. परंतु त्यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय फिरवत पुन्हा राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेऊन साडेतीन वर्षांपासून भाजप बरोबर असलेले संबध तोडले आहेत.
नगराध्यक्ष निखिल घायतडक व दहा नगरसेवकांची आज सोमवारी बैठक झाली. या बैठकीत विचारविनिमय होऊन नगरपरिषदेचा कार्यकाळ काही महिन्यांवर आला असल्याने शहराच्या विकासकामात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्वजण मिळून एकजुटीने काम करू असे बैठकीत ठरले. त्यामुळे नगराध्यक्ष निखिल घायतडक सह इतर दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे न देता आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे ठरले आहे.