स्टेट बॅंकेला पुन्हा साडेबारा लाखांचा गंडा

नगर  – स्टेट बॅंकेच्या लालटाकी रोड व सर्जेपुरातील शितलादेवी मंदिर परिसरातील एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड करून, तब्बल 12 लाख 65 हजार रुपयांची रक्कम काढून बॅंकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य शाखेतील फसवणुकीची घटना ताजी असतानाच आणखी एक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात वीरेंद्र यादव, श्‍वेता कमलेश सिंग, पवन (पूर्ण नाव माहित नाही) व इतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध संगनमताने बॅंकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, आरोपींनी बॅंकेच्या एटीएमचा वापर करून सर्जेपुरा येथील लालटाकी रोड व पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शितलादेवी मंदिराशेजारच्या स्टेट बॅंकेच्या एटीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड केला. तेथून व्यवहार करून 12 लाख 65 हजार रुपये काढले व स्टेट बॅंक इंडियाची फसवणूक केली. याप्रकरणी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी मेघाश्‍याम इंजेवार यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोळंके हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.