#TestCricket : कसोटी क्रमवारीत रोहितची झेप

दुबई – भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टॉप- 10 मध्ये स्थान मिळवले आहे. त्याने अहमदाबादच्या कसोटीतील दोन्ही डावांतील खेळीच्या जोरावर या क्रमवारीत सहा स्थानांनी झेप घेत आठवे स्थान प्राप्त केले आहे.

क्रमवारीतील पहिल्या 7 फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे. चेतेश्‍वर पुजाराची मात्र, दोन स्थानांनी घसरण झाली असून तो आता 10 व्या स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन याला 4 स्थानांची बढती मिळाली असून तो तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. जसप्रीत बुमराहची एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानी पोहोचला आहे.

तसेच इंग्लंडचे दोन वेगवान वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स ऍण्डरसन यांचीही घसरण झाली असून ऍण्डरसन सहाव्या तर, ब्रॉड सातव्या क्रमांकावर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.