#INDvENG : खेळपट्टीबाबतचे कोहलीचे समर्थन चुकीचे – स्ट्रॉस

अहमदाबाद – तिसरा कसोटी सामना हा फक्त दोन दिवसांतच संपला. या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर अनेकांनी टीका केली होती. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या खेळपट्टीचे समर्थन केले. त्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार ऍण्ड्रयू स्ट्रॉस याने संताप व्क्त केला आहे. अशा अत्यंत सुमार व दर्जाहिन खेळपट्टीचे समर्थन करुन कोहली चूक करत आहे, अशा शब्दात त्याने आपला कोहलीवरचा संताप बाहेर काढला आहे.

येथे झालेली तिसरी कसोटी प्रकाशझोतात खेळवण्यात आली होती. पाच दिवसांचा हा सामना केवळ दोनच दिवसांत संपला. त्यावर दोन्ही देशांतील आजी माजी क्रिकेटपटूंनी आपली मते व्यक्त केली. कोहलीने मात्र, या खेळपट्टीचे समर्थन केले. त्यावर स्ट्रॉसने कोहलीला खडेबोल सुनावले आहेत.

कोहलीने या सामन्यासाठीची खेळपट्टी तयार केलेल्या क्‍युरेटरची डिग्री तपासली होती का. खेळपट्टीची पाठराखण करत असताना कोहलीने क्‍युरेटरचा अनुभव तरी पाहिला होती का. ज्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नसते, तिथे तुम्ही खेळपट्टीला दोष द्यायला हवा. तुम्ही त्यावेळी फलंदाजांची चूक झाली असे कसे काय म्हणू शकता. सामना दोन दिवसांत संपूनही कोहलीने खेळपट्टीची पाठाराखण केली.

यासाठी कोहलीवर बीसीसीआयकडून दडपण टाकले गेले असावे. कारण ही खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी योग्य असूच शकत नाही. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे हे कठिण काम होते. खेळपट्टी खराब असताना तुम्ही फलंदाजांना कसे काय दोष देऊ शकता, अशी विचारणाही स्ट्रॉसने केली आहे.

बॉयकॉट यांचीही आगपाखड

अहमदाबादची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पहिल्या दिवशीच पाहणी करताना लक्षात आले होते. मात्र, तरीही इंग्लंडच्या संघात तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय कोणाचा होता. संघात एक फिरकी गोलंदाज जास्त असायला हवा होता. जर भारतात कसोटी सामने जिंकायचे असतील तर याचा विचार केला गेला पाहिजे, अशा शब्दात इंग्लंडचे माजी कसोटीपटू व समालोचक जेफ बॉयकॉट यांनी आपल्या संघावरच आगपाखड केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.