नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. कारण आज पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी आज काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार करून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Terrorists fired upon one civilian from minority namely Sanjay Sharma from Pulwama while on way to local market. He was shifted to hospital however, he succumbed to injuries. There was Armed guard in his village. Area cordoned off. Details shall follow: Kashmir Police pic.twitter.com/cX5m9LaXdf
— ANI (@ANI) February 26, 2023
संजय शर्मा यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. संजय शर्मा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.माहितीनुसार पुलवामामध्ये अचन भागात राहणारे संजय शर्मा रविवारी काही कामासाठी बाजारात जात होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेले, मात्र त्याला वाचवता आले नाही.
दहशतवाद्यांनी या अगोदर शुक्रवारी रात्री देखील आसिफ अली यांच्यावर हल्ला केला होता. आसिफ अली नमाज अदा करून मशिदीतून परत येत होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना घेरले. बिजबिहारा भागातील हसनपोरा तवेला येथे दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमीचे वडील अली मोहम्मद गनई हे पोलिसात हेड कॉन्स्टेबल होते. २९ जानेवारी २०२२ रोजी मशिदीबाहेर दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.