नवी दिल्ली – डिसेंबर 2021 मध्ये लुधियानाच्या कोर्ट इमारत आवारात बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या कटातील फरारी आणि वॉंटेड दहशतवादी हरप्रीत सिंग याला एनआयएने दिल्लीच्या विमानतळावर ताब्यात घेतले आहे. मलेशियाच्या कौलालंपूर येथून त्याचे आगमन झाल्यानंतर लगेचच त्याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन संघटनेचा पाकिस्तानस्थित स्वयंभू प्रमुख लखबीर सिंग रोडे याचा तो साथीदार आहे. लुधियानाच्या कोर्टाच्या आवारात झालेल्या या भीषण बॉम्बस्फोटात एक ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.
हरप्रीत हा अमृतसर जिल्ह्यातील रहिवासी आहे. रोडेच्या निर्देशानुसार, हरप्रीतने इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) पेरण्याचे काम केले होते. यासाठीचे मटेरिअल पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते. हरप्रीत याच्यावर स्फोटके, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी यासह विविध गुन्हे दाखल आहेत.
Uttar Pradesh Politics : आमच्याकडचे शंभर आमदार घ्या आणि मुख्यमंत्री व्हा…
यापूर्वी एनआयएने हरप्रीत सिंगवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ज्यांच्या विरोधात विशेष एनआयए न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते आणि तसेच त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.