रामपूर (उत्तर प्रदेश) :– आमच्याकडचे शंभर आमदार घ्या आणि मुख्यमंत्री व्हा अशी खुली ऑफर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केला आहे पण त्यात त्यांना यश आलेले नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न करावेत आमचे आमदार त्यांना मदत करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
रामपूर येथे पोटनिवडणुकीतील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी उपरोधिकपणे ही ऑफर दिली. ज्यांच्यावर अन्याय होत आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की, मुख्यमंत्र्यी योगी आदित्यनाथ यांची फाइल माझ्याकडे मी मुख्यमंत्री असतानाच्या काळात आली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे फाइलमध्ये म्हटले होते. पण, आम्ही तसे केले नाही. द्वेषाचे आणि सूडाचे राजकारण आम्हाला मान्य नसल्याने आम्ही फाईल परत केली. पण आज मात्र विरोधकांवर द्वेषबुद्धीतून कारवाई केली जात आहे.
Rajasthan Congress crisis : गहलोत-पायलट यांच्यात धुसफूस सुरूच; गुजरातच्या निकालानंतर…
आता आम्हाला इतके कठोर करू नका की आम्ही सत्तेवर आल्यावर आम्ही तेच करू जे तुम्ही आज आमच्याशी करत आहात, असा इशाराही त्यांनी योगी सरकारला दिला. मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील प्रचारात ते बोलत होते.