लाहोर : पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका किल्ल्यामध्ये असलेल्या निमलष्करी दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या हल्ल्यात ६ जवानांचा मृत्यू झाला असून २२ जवान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. निमलष्करी दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ३ हल्लेखोरांना ठार करण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर टँक जिल्ह्याकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात आली असल्याचे पाकिस्तनाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Serial Blasts in #Peshawar of Pakistan. #Terrorstate of is under turmoil. Terrorist attack on #Pakistan paramilitary Forces #FC camp in Tank.
Many Causalities and 22 injured
3 attackers hv been killed so far.
& #ImranKhan say Pak is safe.#PeshawarBlast #RanaAyyub #Encounter pic.twitter.com/es24wq0xrt— Sunaina Bhola (@sunaina_bhola) March 30, 2022
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, “हे दहशतवादी बलुचिस्तानमधील नूशकी आणि पंजगुरच्या पद्धतीने हल्ला करत होते. नूशकी आणि पंजगुरमध्ये दहशतवादी शिबिरात लपून बसले आणि त्यांनी अनेक सैनिकांची हत्या केली होती.
पाकिस्तान निमलष्करी दलावर हल्ला करणारे दहशतवादी अमेरिकी शस्त्रास्त्रांसह हल्ला करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. आतापर्यंत सैन्याला तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. तसेच हल्ल्यात जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.