मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची प्रतिक्षा होती, तो चित्रपट अखेर आज (25 मार्च 2022) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. एस. एस. राजामौली यांचा बहुचर्चित “रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच ‘RRR’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेरसिक अनेक वर्षांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.
या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरणसह आलिया भट्ट आणि अजय देवगण या सारखे अनेक तगडे कलाकार झळकले आहेत. आरआरआर हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे.
#RRR feveRRR grips mass circuits… SupeRRRb hold… Will cross *lifetime biz* of #Rajamouli‘s *first Blockbuster* #Baahubali [#Hindi] in *Week 1*… RRRacing towards ₹ 200 cr… Fri 20.07 cr, Sat 24 cr, Sun 31.50 cr, Mon 17 cr, Tue 15.02 cr. Total: ₹ 107.59 cr. #India biz. pic.twitter.com/mikZRMFrq8
— taran adarsh (@taran_adarsh) March 30, 2022
दरम्यान, चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये धमाकेदार इंट्री घेतली असून, आता पर्यंत चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत 107.59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘बाहुबली: द बिगनिंग’च्या संपूर्ण कमाईचा आकडा RRR हा पहिल्या आठवड्यातच पार करणार आहे. त्यामुळे हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक सिनेमा ठरला आहे. जगभरातील या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे.