उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रकने मॅक्स जीपला धकड दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक तरुण जखमी झाला आहे. जखमीवर आग्रा येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 2 च्या सुमारास फिरोजाबाद जिल्ह्यातील तुंडला पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्सजवळ ट्रकने मॅक्स जीपला धडक दिली. मॅक्समध्ये बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणास उपचारासाठी आग्रा येथे पाठवण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच तुंडला पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. अपघातादरम्यान आग्रा फिरोजाबाद महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी वेळेच हा मार्ग मोकळा केला आहे.