आठवी शशी वैद्य मेमोरियल आंतर क्‍लब टेनिस स्पर्धा : पीवायसी अ संघाला विजेतेपद

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्‍लब अजिंक्‍यपद टेनिस स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी अ संघाने पीवायसी ब संघाचा 21-11 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पीवायसी अ संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग आठव्या वर्षी विजेतेपदाचा मान पटकावला. अंतिम फेरीच्या सामन्यात 100 अधिक गटात पीवायसी अ संघाच्या केदार शहा व डॉ.अभय जमेनिस यांना पीवायसी ब संघाच्या अनुप मिंडा व हिमांशू गोसावी यांनी 3-6 असे पराभूत केले.त्यानंतर खुल्या गटात पीवायसी अ संघाच्या अभिषेक ताम्हाणे व केतन धुमाळ यांनी पीवायसी ब संघाच्या योगेश पंतसचिव व अमित लाटे या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली.

90 अधिक गटात पीवायसी अ संघाच्या ऋतू कुलकर्णीने जयंत कढेच्या साथीत सारंग पाबळकर व सुंदर अय्यर यांचा 6-0 असा तर, खुल्या गटात पीवायसी अ संघाच्या केदार शहा व प्रशांत सुतार या जोडीने पीवायसी ब संघाच्या अमोघ बेहेरे व अनुप मिंडा यांचा 6-2 असा सहज पराभव करून संघाचा विजय सुकर केला.

स्पर्धेतील विजेत्या पीवायसी अ संघाला 40 हजार रुपये व शशी वैद्य मेमोरियल करंडक, तर उपविजेत्या पीवायसी ब संघाला 15 हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्‍लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, क्‍लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, गिरीश करंबेळकर, सारंग लागू, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल: अंतिम फेरी :

पीवायसी अ वि.वि.पीवायसी ब 21-11(100अधिक गट: केदार शहा/डॉ.अभय जमेनिस पराभूत वि.अनुप मिंडा/हिमांशू गोसावी 3-6; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.योगेश पंतसचिव/अमित लाटे 6-3; 90अधिक गट: ऋतू कुलकर्णी/जयंत कढे वि.वि.सारंग पाबळकर/सुंदर अय्यर 6-0; खुला गट: केदार शहा/प्रशांत सुतार वि.वि.अमोघ बेहेरे/अनुप मिंडा 6-2).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.