पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन ओम दळवी मेमोरियल टेनिस स्कुल करंडक १२ व १४वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात श्रीमई संतोष, श्रीजा कलशेट्टी, शरण्या सावंत यांनी तर, मुलांच्या गटात आदित्य उपाध्ये, विआन पेंडुरकर यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.
महाराष्ट्र पोलीस टेनिस जिमखाना, औंध या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत १२ वर्षांखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत बिगरमानांकीत श्रीमई संतोषने पाचव्या मानांकित गौरी बगाडेचा ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला. चौथ्या मानांकित श्रीजा कलशेट्टीने तनया साठेचा ६-१ असा पराभव केला.
अव्वल मानांकित वाण्या अगरवाल व दुसऱ्या मानांकित शरण्या सावंत यांनी आराध्या राठी व सर्वज्ञा जगताप ६-० अशा सारख्याच फरकाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित सान्वी गोसावीने आराध्या मेंडकेपाटीलचा टायब्रेकमध्ये ६-५(१) असा पराभव केला.
#FIDE Rating : 21 वर्षीय अर्जुन बनला भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू; विश्वनाथन आनंदला टाकलं मागे…
मुलांच्या गटात अव्वल मानांकित आर्यन बॅनर्जीने राजदीप नगरकरचा ६-२ असा तर, आदित्य उपाध्येने पाचव्या मानांकित आदित्य शहाचा ६-४ असा पराभव करून आगेकूच केली. विआन पेंडुरकरने आठव्या मानांकित विवान डिक्करचे आव्हान ६-२ असे संपुष्टात आणले. दुसऱ्या मानांकित अहान भट्टाचार्यने कुमार कौटिल्यवर ६-० असा विजय मिळवला.