पेराल ते उगवेल ; रोहित पवारांचे भाजप-सेनेवर टीकास्त्र

पुणे: अमळनेर येथे बुधवारी संध्याकाळी ५:३० वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर धक्काबुक्की तर माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांना मारहाण करण्यात आली.

पालकमंत्री गिरीश महाजनांसमोर कार्यकर्त्यांनी भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जळगावमधील भाजपच्या सभेत हा राडा झाला. गिरीश महाजन यांनाही खाली खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, गिरीश महाजन यांनी काही कार्यकर्त्यांना ढकलून दिलं. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी हा राडा थांबवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजप- शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, जे पेराल ते उगवेल. गेली साडेचार वर्ष सत्तेत एकत्र राहून देखील भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. भारतीय जनता पक्षाच काम पाहून शिवसेनेचे नेते कधी राजीनामा देतात याची वाट शिवसैनिक पहात होते मात्र सत्तेच्या स्वार्थासाठी सेना भाजपा एकत्र आले असल्याची टीका त्यांनी केली.

रोहित पवार समोर म्हणाले, पण लोकांच काय? पक्षासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांच काय? हे प्रश्न ज्या पक्षाला पडत नाहीत त्याच पक्षासोबत असा प्रकार घडण्याची वेळ येते. अन्यायाची भाषा कार्यकर्त्यांना चांगलीच समजते म्हणूनच हा प्रकार भाजपच्या नेत्यांना सहन करावा लागतोय. वातावरण पहाता हाच प्रकार राज्यातल्या ठिकठिकाणी घडण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.