सई जाधवचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

कोल्हापूर – सई नितीन जाधव (वय 8) हिने येथे पार पडलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल ची कमाई करत यश संपादन केले. सई येथील यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिर, कसबा बावडा या शाळेची विद्यार्थिनी आहे.

इचलकरंजी चेस अकॅडमी आणि चेक मेट क्‍लासेसच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये 20 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मध्ये सईने सर्वोत्कृष्ट खेळ दाखवत विजेतेपद पटकावले. तिला वर्गशिक्षिका विद्या पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापीका हिरुगडे यांचे प्रोत्साहन लाभले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.