पुणे : भारताचा कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. श्रीलंकेविरूध्दच्या अखेरच्या टी-२० सामन्यात कोहलीने पहिली धाव घेतली आणि कर्णधार म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० ) ११ हजार धावा पूर्ण केल्या.
विशेष म्हणजे हा टप्पा कमी डावांत गाठणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. कोहलीने हा टप्पा १९६ डावांत गाठत त्याने आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला. रिकी पाँटिंगने २५२ डावात, ग्रॅमी स्मिथ २६४, महेंद्रसिंह धोनीने ३२४ डावात ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
कर्णधार म्हणून ११ हजार धावा पूर्ण करणारा कोहली दुसरा भारतीय तर जगातील सहावा खेळाडू ठरला. याआधी महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यात ११ हजार २०७ धावा केल्या आहेत. यापूर्वी ६ कर्णधारांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.