नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत येत्या १७ जानेवारीपासून युवाविश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी भारताचे अनिल चौधरी या एकमेव पंचाची नियुक्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केली आहे.
भारताचे प्रतिनिधित्व करणारे अनिल चौधरी हे एकमेव पंच ठरले आहे. मूळचे दिल्लीचे असलेल्या चौधरी यांनी यापूर्वीही 19 वर्षांखालील विश्वकरंडकात पंच म्हणून कामगिरी पार पाडली आहे.
चौधरी यांनी २० एकदिवसीय आणि २७ टी-२० सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने विविध देशांच्या १२ पंचांची नियुक्ती केली आहे.