नवी दिल्ली – विद्यार्थ्यांना सुशिक्षित उमेदवाराला मत देण्यास आवाहन करणाऱ्या एका शिक्षकाचा मुद्दा चर्चेत आला होता. शिक्षकाचे नाव >करण सांगवान असूनअनअकेडमीने बडतर्फ केले आहे.ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म चालवणारी कंपनी EdTech म्हणते की क्लासरूम ही वैयक्तिक मते शेअर करण्याची जागा नाही.
आता या प्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिक्षकांना लोकांना मतदान करण्यास लावणे त्याबाबत सांगणे गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. युनाकेडमीचे सह- संस्थापक रोमन सेमी यांनी या सम्पूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, सांगवान यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे यामुळे त्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. तर याबाबत शिक्षक करण सांगवान यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हंटले आहे की मी या संपूर्ण प्रकरणावर १९ ऑगस्ट म्हणजे उदयाला बोलणार आहे.
करण सांगवान म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे मी वादात आहे आणि या वादामुळे न्यायिक सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यांच्यासोबतच मलाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.” सांगवान ज्या वादग्रस्त व्हिडिओचा उल्लेख करत आहेत, त्यात ते विद्यार्थ्यांना पुढच्या वेळी सुशिक्षित उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सुशिक्षित लोकांना मतदान करण्याचे आवाहन करणे गुन्हा आहे का? जर कोणी अशिक्षित असेल तर मी त्याचा वैयक्तिक आदर करतो. पण लोकप्रतिनिधी निरक्षर असू शकत नाहीत. हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. अशिक्षित लोकप्रतिनिधी एकविसाव्या शतकातील आधुनिक भारत कधीच घडवू शकत नाहीत.
पढ़े-लिखे नेता को वोट देने की बात कहने वाले हिसार के टीचर करन सांगवान को #Unacademy ने नौकरी से निकाल दिया।
एक तो ये सरकार रोज़गार देने में पूरी तरह नाकामयाब है, दूसरा कोई युवा अपनी मेहनत से नौकरी हासिल कर ले, तो उसे नौकरी से निकलवा देते हैं, करण बेटा हमें आप पर गर्व है! pic.twitter.com/YP7Ot5iV4Z
— जावेद चौधरी (@Javed_Netaji) August 18, 2023