अधिक रक्कम काढल्यास लागणार कर?

file pic

नवी दिल्ली – सरकार एका वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम काढणाऱ्यांवर कर आकारण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा करताना पॅन कार्ड अनिवार्य असेल तर मोठ्या रकमेचा व्यवहार करताना आधार कार्ड अनिवार्य करण्याचा प्रस्ताव अजूनही विचारात आहे.

आधार कार्ड अनिवार्य केल्यास व्यक्तिगत कर ट्रॅक करण्यास मदत होईल, असे मानले जात आहे. येत्या 5 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पहिले बजेट सादर करणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)