मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.
दरम्यान, करोना व्हायरसचा वाढत प्रभाव पाहता सरकारने तातडीने सर्वप्रकारची सार्वजनिक स्थळं, पर्यटन स्थळं आणि चित्रपट, मालिकांचं चित्रीकरण येत्या गुरुवारपासून बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तारक मेहता मालिकेच्या निर्मात्यांनी ट्विटकरून आम्हाला शूटिंग चालू ठेवण्याची परवानगी द्या अशी पोस्ट शेअर केली आहे.
@mybmc @bmcmumbai ?? Sir please guide us about your circular?All Shootings at all places&Filmcity closed?MIDC,factories,SEZ,Govt off,Pvt off closed from today?Sir please guide.We are taking all precautions suggested by Govt??can we shoot with limited unit pic.twitter.com/tqDKvZftnx
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) March 17, 2020
तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांनी सरकारकडे मालिकेचं चित्रीकरण करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. एवढंच नाही तर स्वच्छतेची आणि इतर सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल असं आश्वासनही दिलं आहे.
@mybmc @bmcmumbai @MaharashtraCmo Sir,?? we are not getting any clarity about this circulars.suddenly filmcity not allowing us to shoot.We are following preventive guideline to keep hygiene on set and working with smaller unit.Sir,please allow till Tomm pic.twitter.com/H5ips2Jsnr
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) March 17, 2020