पुणे :– प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या लढतीत तमिळ थलैवाज संघाने जयपूर पिंक पॅंथर्सचा 38-27 असा दणदणीत पराभव केला. या सामन्यात नरेंद्र होशियारने मिळवलेल्या 13 गुणांच्या जोरावर तमिळ संघाने पहिल्या सत्रापासूनच वर्चस्व ठेवले व ते अखेरपर्यंत ते कायम राखले. अजिंक्य पवार व हिमांशू यांनीही सरस कामगिरी केली. पिंक पॅंथर्सकडून अर्जुन देशवाल व भवानी राजपूत यांनीही चांगली लढत दिली.
The @tamilthalaivas win BIG in Pune 🥳
How would you rate this victory out of 🔟 ?#vivoProKabaddi #FantasticPanga #CHEvJPP pic.twitter.com/Vql94qR9i3
— ProKabaddi (@ProKabaddi) October 28, 2022
यापूर्वी बुधवारी झालेल्या सामन्यांत यु मंबाने गुजरात जायंट्सचा 37-29 असा सहज पराभव केला. या सामन्यात गुमान सिंगने 12 तर, हेदार्ली एकरामीने 10 गुण मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला. गुजरातकडून राकेश संग्रोयाने 12 गुण मिळवत एकाही लढत दिली. मात्र, त्याची ही कामगिरी व्यर्थ ठरली व यु मंबाने हा सामना सहज जिंकला. अन्य लढतीत बंगाल वॉरिअर्सने दबंग दिल्लीचा 35-30 असा पराभव केला व स्पर्धेत आगेकूच कायम राखली.
बंगालकडून मनिंदर सिंगने 10 तर, वैभव गर्जेने 6 गुण मिळवताना चांगल्या पकडी केल्या. दिल्लीच्या नविन कुमारने 10 गुण मिळवले मात्र, त्याला अन्य खेळाडूंची साथ लाभली नाही व संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
यापूर्वी झालेल्या लढतीत हरियाणा स्टिलर्सने तेलगू टायटन्सवर 43-24 अशी दणदणित मात केली. हरियाणाकडून मीतूने 13 गुणांची कमाई केली. तेलगू संघाच्या सिद्धार्थ देसाईने 5 गुण मिळवले मात्र, त्यांना सातत्यान अपयश आले व त्याचा लाभ हरियाणा संघाने घेतला व बाजी मारली.