Dabang Delhi K.C. vs Jaipur Pink Panthers, Pro Kabaddi League 2023-24 : सध्याचा चॅम्पियन जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी लीग 2023-24 मधील पॉइंट टेबलमध्ये पुन्हा एकदा नंबर वन संघ बनला आहे. बुधवारी नवी दिल्लीतील त्यागराज इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मोसमातील 110व्या सामन्यात जयपूरने यजमान दबंग दिल्लीचा 27-22 असा पराभव केला.
अर्जुन देशवालने जयपूरसाठी पुन्हा एकदा सुपर-10 तर दिल्लीसाठी आशु मलिकने नऊ गुण मिळवले. या पराभवानंतर दिल्लीला प्लेऑफसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
The Race to the Playoffs 👉 📈💪💯
Here’s the points table after a 😍 Delhi leg 🫡#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #BLRvPUN #DELvJPP pic.twitter.com/mzmsSIErIv
— ProKabaddi (@ProKabaddi) February 7, 2024
सध्याच्या चॅम्पियन जयपूर पिंक पँथर्सचा 19 सामन्यांमधला हा 13वा विजय असून या संघाचे आता 77 गुण झाले आहेत. यासह जयपूर पुन्हा गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आला आहे. दबंग दिल्लीला 20 सामन्यांमध्ये सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाच्या खात्यात सध्या 69 गुण आहेत आणि ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
पूर्वार्धाच्या शेवटच्या मिनिटाला आशू स्पर्श न करताच(गुण न मिळवता) संघाच्या लॉबीत गेला आणि जयपूरची आघाडी मजबूत झाली. यासह जयपूर पिंक पँथर्सने ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी 16-9 अशी आघाडी घेतली. हाफ टाईमनंतर दिल्ली संघाने मॅटवर पुनरागमन करत आपले वर्चस्व दाखवण्यास सुरुवात केली. पण संघ जयपूरची बरोबरी करू शकले नाही. 25 व्या मिनिटापर्यंत पिंक पँथर्सकडे आठ गुणांची आघाडी होती आणि संघ 19-11 ने पुढे होता.
#PKLSeason10 (#BLRvPUN Match 109) : पुणेरी पलटणचा औपचारीक विजय, बंगळुरुचा केला 9 गुणांनी पराभव…
शेवटच्या पाच मिनिटांत जयपूरकडे केवळ दोन गुणांची आघाडी शिल्लक होती आणि गुणसंख्या 23-21 अशी होती. मात्र, 38व्या मिनिटाला आशूने टॅकल केले आणि जयपूरकडे पुन्हा चार गुणांची आघाडी झाली. जयपूर पिंक पँथर्सने ही आघाडी अखेरच्या क्षणापर्यंत कमी होऊ दिली नाही आणि दबंग दिल्लीचा त्यांच्या घरच्या मैदानावर 27-22 असा पराभव केला.