PKL Season 10 : पुणेरी पलटणने प्रो-कबड्डी लीग 2023-24 मध्ये इतिहास रचला आहे. PKL 2023-24 मध्ये, त्यांनी लीग टप्प्यात 96 गुण मिळवले आणि एका हंगामात सर्वाधिक गुण मिळवणारा संघ बनला आहे. त्यानी गुजरात जायंट्सचा विक्रम मोडला आहे, ज्याने सीझन 6 मध्ये ही कामगिरी केली होती. याशिवाय पुण्याने प्रथमच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
सीझन 6 मध्ये, गुजरात जायंट्सने 22 सामन्यांमध्ये 93 गुण मिळवून झोन ए पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले होते. पुणेरी पलटणने गुरूवारी (22 फेब्रुवारी) यूपी योद्धाविरुद्ध दोन गुणांनी विजय मिळवून तो विक्रम मोडला. या विजयामुळे पलटनचे 22 सामन्यांतून एकूण 96 गुण झाले आहेत.
𝗔 𝗦𝗘𝗔𝗦𝗢𝗡 𝗧𝗢 𝗥𝗘𝗠𝗘𝗠𝗕𝗘𝗥 🤩🔥
Puneri Paltan finished the #PKLSeason10 league stage with a record-breaking points tally 💪#ProKabaddi #ProKabaddiLeague #HarSaansMeinKabaddi #PKL10 #PKL #PuneriPaltan #PKLPlayoffs pic.twitter.com/N4XtYUWvIM
— ProKabaddi (@ProKabaddi) February 22, 2024
जयपूर पिंक पँथर्स गुजरात जायंट्सचा विक्रम मोडण्यास मुकली. पिंक पँथर्सने यंदाच्या मोसमात 92 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. 2023/24 प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या लीग टप्प्यात पलटनचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होता. पुणेस्थित फ्रँचायझीने 22 लीग सामन्यांपैकी फक्त दोनच सामने गमावले. त्यानी त्याच्या इतर 20 सामन्यांमध्ये 17 विजय आणि तीन बरोबरी नोंदवली.
सीझन 6 मध्ये, गुजरात जायंट्सने 22 सामन्यांमध्ये 17 विजय मिळवले होते. तथापि, त्यांनी तीन सामने गमावले आणि इतर दोन अनिर्णित राखले होते, ज्यामुळे त्यांचे 93 गुण झाले होते.