Dabang Delhi K.C. vs Tamil Thalaivas, Pro Kabaddi League (Kolkata) :– प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या लढतीत दबंग दिल्ली संघाने तमिळ थलायवाज संघाचा ४५-४३ असा अवघ्या २ गुणांनी पराभव केला. पहिल्या सत्रात तमिळने वर्चस्व राखले तर दुसरे सत्र दिल्लीच्या वर्चस्वाचे ठरले.
पहिले सत्र सुरु झाल्यावर बलाढ्य दिल्ली संघावर तमिळ संघानेच दडपण आणले. दिल्लीच्या खेळाडूंकडून अगदी साध्या सुचाक घडल्याव त्याच तमिळ संघाच्या पथ्यावर पडल्या. तमिळ संघाचा नरेंद्र होशियार व एम. अभिषेक यांनी दिल्लीच्या खेळाडूंच्या अफलातून पकडी केल्या व रेड गुणांतही बाजी मारली. दिल्लीच्या अशु मलिकने तुल्यबळ लढत दिली मात्र, त्याला रेड गुणांमध्ये तमिळ संघाची बरोबरी करता आली नाही.
आशु मलिक के दमदार खेल ने दूसरे हाफ़ में पलटी बाज़ी 💪
रोमांचक मुक़ाबले में दबंग अंदाज़ के साथ दिल्ली ने दर्ज की अपनी 12वीं जीत 😍#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #DELvCHE #DabangDelhiKC #TamilThalaivas pic.twitter.com/AtCEC4ZHjD
— ProKabaddi (@ProKabaddi) February 14, 2024
पहिले सत्र संपूर्णपणे तमिळ संघाच्या वर्चस्वाचे ठरले. या सत्राअखेरीस तमिळ संघ २५ विरुद्ध १४ असा आघाडीवर होता. दुसरे सत्र सुरु झाल्यावर मात्र, दिल्लीने जोरदार प्रतिकार केला. त्यांनी ही पिछाडी भरून काढताना सामन्यात एकवेळ ३४-३८ तर लगेचच ३८-३९ अशी रंगत निर्माण केली.
#PKLSeason10 ( #UPvJPP Match 117) : जयपुरचे स्पर्धेतील वर्चस्व कायम, युपीला 37 गुणांनी केलं पराभूत…
यावेळी ते केवळ १ गुणांनी पिछाडीवर होते. सामन्यात केवळ २ मिनिटे बाकी असताना या दोन संघांची ३९-३९ अशी बरोबरीही झाली. त्यानंतर दिल्लीने सामन्यावर पकड घेतली व हा सामना ४५ विरुद्ध ४३ असा थरारकपणे जिंकला.