पणजी :- फिफा आयोजित व भारताच्या यजमानपदाखाली येथे सुरु असलेल्या फिफा 17 वर्षांखालील महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल ( FIFA Women’s U-17 World Cup) स्पर्धेत स्पेन व कोलंबिया या संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. आता या दोन संघात येत्या रविवारी विजेतेपदाची लढत रंगणार आहे. तसेच त्यापूर्वी नायजेरीया व जर्मनी यांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना होणार आहे.
बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत कोलंबियाने नायजेरीयाचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 6-5 असा पराभव केला. हा सामना पूर्ण वेळेत गोलशुुन्य बरोबरीत सुटला होता, त्यानंतर घेण्यात आलेल्या पेनल्टी शुटआऊटमध्ये कोलंबियाने एका गुणाने बाजी मारली व अंतिम फेरी गाठली.
We saw two incredible semi-finals tonight! 🙌
Final: 🇨🇴 v 🇪🇸
Third-place match: 🇳🇬 v 🇩🇪
When: Sunday 30 October! #U17WWC | #KickOffTheDream— FIFA Women’s World Cup (@FIFAWWC) October 26, 2022
दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पेनने जर्मनीवर 1-0 असा विजय मिळवला. स्पेनच्या लुसिया कार्लेज अल्वारेझने 90 व्या मिनिटाला गोल केला व संघाचा विजय साकार केला. या सामन्यात पूर्ण वेळेत सामना सुरु असताना दोन्ही संघांनी आफलातून बचावाचे प्रदर्शन केले.
मात्र, अखेरच्या काही सेकंदात जर्मनीचा बचाव कमी पडला व त्याचा लाभ घेत स्पेनच्या लुईसाने महत्वपूर्ण गोल करत आपल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. या दोन सामन्यांत पराभूत झालेले नायजोरीया व जर्मनी हे दोन संघ तिसऱ्या क्रमांकासाठी लढतील.