तळेगाव ढमढेरे -शिरूर तालुक्यात झपाट्याने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या तळेगाव ढमढेरेसह निमगाव म्हाळुंगी या दोन गावांत कंटेन्मेंट झोन घोषित केले आहे. या क्षेत्रांमधील नागरिकांकडून दुचाकी व चारचाकी वाहन वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
तसेच क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक कामांसाठी वापरात येणाऱ्या वाहनांना व्यतिरिक्त इतर सर्व वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. येथील नागरीकांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे. आणि अनावश्यक घराबाहेर पाडल्यास हमखास कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार भागांमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी आदेश पारित केले आहेत.